Sunday, June 7, 2009

"मी आणि......... ": पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!

"मी आणि......... ": पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!

"मी आणि......... ": पहीली भेट....

"मी आणि......... ": पहीली भेट....

"मी आणि......... ": पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!

"मी आणि......... ": पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!

पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!


.


पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!

तुझ्या-माझ्या ओल्या भेटीचे क्षण परत एकदा रोमांचित करुन गेले....!


अचानक बरसलेल्या त्या पावसाने मनातले भाव खोलवर नेले....!

तोच होता अविस्मरनिय दिवस जिथे तुझे-माझे अंतर संपले...!


त्याच पावसात काही गमावल्याचे व्रण खोलवर दडले होते......!

त्याच पावसात तुझ्या प्रेमाने मला नकळत कवेत ओढले होते....!


तुझ्या आलिंगणात प्रथमच प्रेमाच्या उबदारतेला मी अनुभवले....!

रडून-रडून केव्हा तुला येउन बिलगले हे मात्र आजही कोडेच राहीले....!


रोजच्याच त्या रस्त्याने पानझड आटोपल्या सारखे हिरवागार केले...!

अबोल आपल्या मनांना याच भेटीत निसर्गाने जवळ केले....!


आजचाही पाउस असाच काही होता पण समाधान डोळ्यात होते....!

कदाचीत हीच ना ती आत्मियता??? तुझे नी माझे मन कित्येक पावसाळे शोधत होते...!!!


--मौसम


.

Monday, April 13, 2009

एक रेघ म्हणून जन्माला येते एक स्त्री.....!


.


एक रेघ म्हणून जन्माला येते एक स्त्री...!


सोबत आई-वडील रुपी दोन रेघा फ़्री....!


दोन्ही हातात-हात बालपणरुपी त्रीकुटाची रीत ही....!


तारुण्यरुपी रेघेत चौरसाची नव्हे ना वाट ती ???


चौरसाच्या वाटेवर आहे भावी संसाराची दुचाकी.....!


पंचकोन,षटकोन,सप्तकोन नकळत करतात विवीध नात्यांची दाटी...!


यातनच होते..नव्या रेघेची उत्पत्ती...स्त्रीशक्ती हीच ती...!



...मौसम

Thursday, May 15, 2008

अजबच आसतो एकटेपणा.....!!


अजबच आसतो ग हा एकटेपणा.....!!


डोळ्यात स्वप्नाचा डोगर घेउन...


मन अश्रुने ओलेचिब होऊन...


उचबळून आलेल्या भावनांना हृदयात साठऊन....


.आपणच नाते पाळायचे...


आज येइल,उद्या येइल म्हणून,


खोटे-खोटेच मनाशी खेळायचे...


आपणच जिवंतपणी मरन स्विकारयचे????


-मौसम

पहीली भेट....


पहीली भेट....


तोही दिवस येइल प्रत्यक्षात,ह्र्दयाशी ह्रदयाची भेट होइल थेट....!


नकळत अविभाज्य घटक होइल,जणू मी फुल तू देठ.....!


तुझी माझी नजरा-नजर जणू इंद्रधनू सुरेख.......!


हवेचा हळूवार झोका हरवून देइल भान करुन देइल समेट......!


तुझे शब्द माझ्यासाठी-माझे तुझ्यासाठी दोघही एकमेकांच्या कवेत.....!


जणू काही प्रेमाच्या या सागरात भरती-ओहोटीची भेट........!!!



मौसम