
.
प्रेम न करता,हे मन का शांत बसेल....!
काय सांगू भविष्यात माझंही कुणावर प्रेम असेल...!
कुणाची तरी वाट पाहण्यात माझही मन झुरेल....!
माझे मन तेव्हा कदाचीत मलाच हरेल....!
"फक्त माझा" म्हणून हक्कही माझाच असेल.....!
काय सांगू मी कदाचित तो दिवस फारसा दुर नसेल...!
माझ्या मनातील भाव ज्या व्यक्ति साठी ऊमलेल.....!
दिवस-रात्र ज्याचेच नाव माझ्या ओठी असेल.....!
क्षणभराचा दुरावा त्याव्यक्ती साठी तपासारखा वाटेल....!
माझ्या मनात अनावधानाने ज्याचेच प्रतिबिंब असेल...!
आज-ना उद्या भेटेल ज्या व्यक्तीला आपले मी मानेल...!
मनातील सारे भाव मी स्वताःहून सांगेल....!
एक ना एक दिवस मला असं कुणी गवसेल....!
माझे मन जेव्हा माझेच उरलेले नसेल......!
असही कधी घडेल मीही 'प्रेमात पडेल'.....!
तोच व्यक्ती माझा "व्हँलेंटाइन" असेल.....!
.......मौसम
.