
मैत्रिचा दवबिंन्दू रुपीओलावा....
शांतता तुझी ही आज मला पहावत नाही.....!
बोल काही तरी तुला अस हिरमुसलेल पाहून मला राहवत नाही.....!
पाणावलेले तुझे डोळे सांग आज का हसत नाही.....!
लक्षात घे मित्रा आयुष्यातील हे सगळ्यात मोठे दुःख नाही....!
संकट हे येणारच इतक्या सहजा-सहजी हारायचे नाही....!
दाखवून दे या जगाला मी ही काही कमी नाही....!
सापडलेल्या युद्धातून काढता पाय घ्यायचा नाही....!
जीवन एक अनमोल ठेवा,माझ्या मैत्रिचा दवबिंन्दू रुपीओलावा,
इतक्या सहज माघार घ्यायची नाही.....!
आहेत सदैव शुभेच्छा,आयुष्यातले आपले कर्तव्य विसरायचे नाही....!
....मौसम