Sunday, June 7, 2009

पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!


.


पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!

तुझ्या-माझ्या ओल्या भेटीचे क्षण परत एकदा रोमांचित करुन गेले....!


अचानक बरसलेल्या त्या पावसाने मनातले भाव खोलवर नेले....!

तोच होता अविस्मरनिय दिवस जिथे तुझे-माझे अंतर संपले...!


त्याच पावसात काही गमावल्याचे व्रण खोलवर दडले होते......!

त्याच पावसात तुझ्या प्रेमाने मला नकळत कवेत ओढले होते....!


तुझ्या आलिंगणात प्रथमच प्रेमाच्या उबदारतेला मी अनुभवले....!

रडून-रडून केव्हा तुला येउन बिलगले हे मात्र आजही कोडेच राहीले....!


रोजच्याच त्या रस्त्याने पानझड आटोपल्या सारखे हिरवागार केले...!

अबोल आपल्या मनांना याच भेटीत निसर्गाने जवळ केले....!


आजचाही पाउस असाच काही होता पण समाधान डोळ्यात होते....!

कदाचीत हीच ना ती आत्मियता??? तुझे नी माझे मन कित्येक पावसाळे शोधत होते...!!!


--मौसम


.

Monday, April 13, 2009

एक रेघ म्हणून जन्माला येते एक स्त्री.....!


.


एक रेघ म्हणून जन्माला येते एक स्त्री...!


सोबत आई-वडील रुपी दोन रेघा फ़्री....!


दोन्ही हातात-हात बालपणरुपी त्रीकुटाची रीत ही....!


तारुण्यरुपी रेघेत चौरसाची नव्हे ना वाट ती ???


चौरसाच्या वाटेवर आहे भावी संसाराची दुचाकी.....!


पंचकोन,षटकोन,सप्तकोन नकळत करतात विवीध नात्यांची दाटी...!


यातनच होते..नव्या रेघेची उत्पत्ती...स्त्रीशक्ती हीच ती...!...मौसम

Thursday, May 15, 2008

अजबच आसतो एकटेपणा.....!!


अजबच आसतो ग हा एकटेपणा.....!!


डोळ्यात स्वप्नाचा डोगर घेउन...


मन अश्रुने ओलेचिब होऊन...


उचबळून आलेल्या भावनांना हृदयात साठऊन....


.आपणच नाते पाळायचे...


आज येइल,उद्या येइल म्हणून,


खोटे-खोटेच मनाशी खेळायचे...


आपणच जिवंतपणी मरन स्विकारयचे????


-मौसम

पहीली भेट....


पहीली भेट....


तोही दिवस येइल प्रत्यक्षात,ह्र्दयाशी ह्रदयाची भेट होइल थेट....!


नकळत अविभाज्य घटक होइल,जणू मी फुल तू देठ.....!


तुझी माझी नजरा-नजर जणू इंद्रधनू सुरेख.......!


हवेचा हळूवार झोका हरवून देइल भान करुन देइल समेट......!


तुझे शब्द माझ्यासाठी-माझे तुझ्यासाठी दोघही एकमेकांच्या कवेत.....!


जणू काही प्रेमाच्या या सागरात भरती-ओहोटीची भेट........!!!मौसम

गुलाबाचे फुल...


गुलाबाचे फुल......बर्याच दिवसांनी आज एक जुनी वही गवसली,


उलट-सुलट करतांना मात्र हातातन निसटली,


तेच जुने फुल होते गुलाबाचे दांडी मात्र तुटली,


दबलेल्या त्या फुलाप्रमाने अश्रु मी दाबत उठली...नाही-नाही म्हणता म्हणता अश्रुनीं मात्र वाट काढली..!करपलेल्या पाकळ्या पाहून आठवणींची तार तुटली,


अजानतेपणाने आज तुझ्या नावाची हाकही उठली,


एके काळचे धारदार काटेही आज बोथट होवून तुटली,


नाही जानू शकले मना-मनांची गाठ एकाएकी कशी सुटली??नाही-नाही म्हणता म्हणता अश्रुनीं मात्र वाट काढली...!बर्याच जुन्या वहीत ही अशी गुलाबी वलय गवसली,


फुल जरी करपले तरी भावना मी मनात प्रसवली,


आपल्या गोड आठवणीची साद आजही आहे बसवली,


भविष्याच्य वाटेत परत भुतकाळाने मान वर काढली,नाही-नाही म्हणता म्हणता अश्रुनीं मात्र वाट काढली....!


-मौसम.

जीवनाचा प्रवास का एकटा वातटोय...!!!


जीवनाचा प्रवास का एकटा वातटोय...तेच चंद्र-तारे परके वाटताताय....


ही वाट कुठे जाणार आहे याचा काहीएक अंदाज नहीयं....


बस पावल नेतील ती नवीन वाट समजायचीयं.......


डोळे काहीसे पणावलेले म्हणतात काहीतरी बोलायचयं......


मनातील स्वप्न असमतोलातेने हळूह्ळू दीसेनासे होताताय.....


काय शोधतयं मन,काय हवय नेमक आयुष्यस कळण्यास मार्ग नाहीयं....


कुठे चुकतयं का माझ, कळायला वाट नाहीयं......


हे अश्रु देखील स्वार्थी झालेत,साथ द्यायचे सोडून डोळ्यातच सामावतातयं....


खोट हसू आणन्यास प्रव्रुत्त करतातयं हेच हे स्वार्ती अश्रु.....


कसला हा नाइलाज आहे, आयुष्याचा.....


इच्छा नसताना हसावलागतयं....-मौसम

Wednesday, June 20, 2007

दवबिंन्दू रुपी ओलावा....


मैत्रिचा दवबिंन्दू रुपीओलावा....


शांतता तुझी ही आज मला पहावत नाही.....!


बोल काही तरी तुला अस हिरमुसलेल पाहून मला राहवत नाही.....!


पाणावलेले तुझे डोळे सांग आज का हसत नाही.....!


लक्षात घे मित्रा आयुष्यातील हे सगळ्यात मोठे दुःख नाही....!


संकट हे येणारच इतक्या सहजा-सहजी हारायचे नाही....!


दाखवून दे या जगाला मी ही काही कमी नाही....!


सापडलेल्या युद्धातून काढता पाय घ्यायचा नाही....!


जीवन एक अनमोल ठेवा,माझ्या मैत्रिचा दवबिंन्दू रुपीओलावा,

इतक्या सहज माघार घ्यायची नाही.....!


आहेत सदैव शुभेच्छा,आयुष्यातले आपले कर्तव्य विसरायचे नाही....!


....मौसम