Thursday, April 19, 2007

नक्षत्रांचे प्रेम.......!!


नक्षत्रांचे प्रेम.......!!

वाटल होत नक्षत्राच्या गर्दित आपणही उतरावे....


एक स्वप्रकशमान चांदनी होउन चंद्राला आपलसं करावे....


आसमंता च्या जगतात आपलेही अस्तीत्व बिंबवावे....


याच क्षितीजात संचारतांना अचानक एका तार्याने मला आपलेसे करावे....


याच नक्षत्रांच्या अंगनात मी ही मुक्तपने हिंडावे....


हाच माझा चंद्र म्हणून त्याच्या प्रकशात जगावे....


माझ्या मनातले हे भाव देवाने ही ऐकले....


एक दिवस मला माझ्या चंद्राने दर्शन दिले....


त्यच्या त्या निर्मळ स्वभावाने मला केव्हाच जिंकले....


कधी ना हरनारी मी मात्र कधी न पाहताच या चंद्राला मी हरले....


अंतर खुप असनार चंद्र-चांदनीत हे मनाने केव्हाच हेरले....


तरीही हे मन वेडे परीघाप्रमाने चंद्राभवतीच गुंतले....


हळू-ह्ळू हे चंद्रालाही कळले,त्याच्या प्रकाशाझोतात,चांदनीने स्वताचे भान हरपले....


तिचे जगने हे केवळ त्याच्या नावाचेच राहीले....


कितीही काही झाले तरीपण चंद्राला चंद्रकलेचे वेड होते....


पोर्णिमा-अमावस्येपर्यन्तच्या कले-कलेमुळे त्याला वेळ मिळत नसे....चांदनी मात्र रोज वाट पाहूण,चंद्राच्या प्रतिक्षेत रुसुन बसे....


आता मात्र त्याचे दुर्लक्ष तिला खपत नसे,यासाठी दोघात रोजच खटके उडत असे....


चंद्राला होत्या बर्याच सीमा,चांदनीला हे कटू सत्य पचत नसे....


एक दिवस चांदनीने केला विचार,अस रुसुन किती दिवस बसायचे....


एक ना एक दिवस वस्तुस्थितीला लागेलच स्विकारायचे....


चंद्रच तो शेवटी अमावस्या येते कधीतरी,पण तो दिवसही दुर नाही जेव्हा अकस्मात ग्रहनही लागायचे....


मग का म्हणून त्याला दुखः हे लादायचे....


का म्हणून त्याचे मुक्तसंचाराचे अधिकार हेरायचे....


शुक्ल-कृष्णपक्षाला लपंडाव खेळनार हा चंद्र हसतमुखाने....


आपण मात्र सदैव आसमंतातच अस्तित्व ठवायचे, विहारायचे....


चंद्राशीवाय प्रकाशमान होवू शकत नाही चांदनी हे संपूर्ण जगाने मानले....


चंद्राच्या प्रकाशात तेज तिचे आज भुगोलानेही सिद्ध केले....


कधी नव्हे ते चांदनीने प्रथमच प्रेम केले....


प्रेमाचे प्रतिक म्हणून संपूर्ण ब्रम्हांड प्रेमींसाठी खुले केले....!!!!!!!



आजही प्रेमी येतात,आपापले चंद्र-चांदनी शोधतात....!

दुखः चंद्र-चांदनीचे जाणूनही ही गोड चुक करतात....!



......मौसम