Sunday, November 26, 2006

तुझी आठवण होताच......


तुझी आठवण होताच......


बोलायच खुप असुनही ओठांना शब्दसुचत नाही....,


शब्द सुचले तरी,मुखाने बोलवत नाही....,


शरिराने असुनही,क्रुती करवत नाही....,


तुझा विचार करतांना,


मी माझीच उरत नाही....,


तुझी आठवण येताच.....!!!

तुझी आठवण येताच......!!!


....मौसम

नातं तुझं आणि माझं......


नातं तुझं आणि माझं......


जीवनातच होते मिलन सुख-दुख्खाच,

सोप नसत वर्णने नात कळी-गुलाबाचं,

आकाशालाही सीमा दाखवेल नातं तुझं आणि माझं......


असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं....


पहिल्या पावसाशिवायच मातीला सुगंध देण्याचं,

दुर असुनसुद्धा मनाने जवळ येण्याचं,

अस्ताच्या सुर्यालासुद्धा सुर्योदय आठवण्याचं...


असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं...

मनाच्या सागरात लहरीत उठण स्पदंनांचं,

क्शितीज्याच्या आशा पल्लवीत करनार्या संदेशाचं,

कोकीळेने मधूर गाणे छेडने स्वर्ण-सुरांचं,


असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं....

रम्य-सुरम्य भेटीला उजाळा देण्याचं,

जसे या नात्या वीणा जगने व्यर्थाचं,

असे हे नाते नाजुक, कोमल, स्पर्शाचं.......


असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं.........


.......मौसम

पण असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....??











पण असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....??


तुझ्याच एका हास्यासाठी,माझे हसणे अडायचे...
तुझ्याच एका शब्दासाठी, माझे कान थांबायचे....
तुझ्याच एका श्वासाविणा माझे श्वास अडायचे....

पण असे का व्हायचे हे माझे मलाच नाही कळायचे....????

तुझ्याच एका भेटीसठी, मनोमन तरसायचे...
तुझ्याच एका स्पर्शासाठी शरीर, हे आसुसायचे...
तुला काही कळू नये असे जरी वाटायचे,तुझेच विचार मनात गिरटया घालायचे.....

पण असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....???

तू नसणार हे जाणूनही भर गर्दित, मन तुलाच शोधायचे.....
तुझे स्वर नसताना देखिल,कान तिकडेच वळायचे......
तु घरी नसताना देखिल ,पाउल तिकडेच वळायचे.......


पण असे का व्हायचे, हे माझे मलाच नाही कळायचे.....???

....मौसम