Wednesday, June 20, 2007

दवबिंन्दू रुपी ओलावा....


मैत्रिचा दवबिंन्दू रुपीओलावा....


शांतता तुझी ही आज मला पहावत नाही.....!


बोल काही तरी तुला अस हिरमुसलेल पाहून मला राहवत नाही.....!


पाणावलेले तुझे डोळे सांग आज का हसत नाही.....!


लक्षात घे मित्रा आयुष्यातील हे सगळ्यात मोठे दुःख नाही....!


संकट हे येणारच इतक्या सहजा-सहजी हारायचे नाही....!


दाखवून दे या जगाला मी ही काही कमी नाही....!


सापडलेल्या युद्धातून काढता पाय घ्यायचा नाही....!


जीवन एक अनमोल ठेवा,माझ्या मैत्रिचा दवबिंन्दू रुपीओलावा,

इतक्या सहज माघार घ्यायची नाही.....!


आहेत सदैव शुभेच्छा,आयुष्यातले आपले कर्तव्य विसरायचे नाही....!


....मौसम

Thursday, April 19, 2007

नक्षत्रांचे प्रेम.......!!


नक्षत्रांचे प्रेम.......!!

वाटल होत नक्षत्राच्या गर्दित आपणही उतरावे....


एक स्वप्रकशमान चांदनी होउन चंद्राला आपलसं करावे....


आसमंता च्या जगतात आपलेही अस्तीत्व बिंबवावे....


याच क्षितीजात संचारतांना अचानक एका तार्याने मला आपलेसे करावे....


याच नक्षत्रांच्या अंगनात मी ही मुक्तपने हिंडावे....


हाच माझा चंद्र म्हणून त्याच्या प्रकशात जगावे....


माझ्या मनातले हे भाव देवाने ही ऐकले....


एक दिवस मला माझ्या चंद्राने दर्शन दिले....


त्यच्या त्या निर्मळ स्वभावाने मला केव्हाच जिंकले....


कधी ना हरनारी मी मात्र कधी न पाहताच या चंद्राला मी हरले....


अंतर खुप असनार चंद्र-चांदनीत हे मनाने केव्हाच हेरले....


तरीही हे मन वेडे परीघाप्रमाने चंद्राभवतीच गुंतले....


हळू-ह्ळू हे चंद्रालाही कळले,त्याच्या प्रकाशाझोतात,चांदनीने स्वताचे भान हरपले....


तिचे जगने हे केवळ त्याच्या नावाचेच राहीले....


कितीही काही झाले तरीपण चंद्राला चंद्रकलेचे वेड होते....


पोर्णिमा-अमावस्येपर्यन्तच्या कले-कलेमुळे त्याला वेळ मिळत नसे....चांदनी मात्र रोज वाट पाहूण,चंद्राच्या प्रतिक्षेत रुसुन बसे....


आता मात्र त्याचे दुर्लक्ष तिला खपत नसे,यासाठी दोघात रोजच खटके उडत असे....


चंद्राला होत्या बर्याच सीमा,चांदनीला हे कटू सत्य पचत नसे....


एक दिवस चांदनीने केला विचार,अस रुसुन किती दिवस बसायचे....


एक ना एक दिवस वस्तुस्थितीला लागेलच स्विकारायचे....


चंद्रच तो शेवटी अमावस्या येते कधीतरी,पण तो दिवसही दुर नाही जेव्हा अकस्मात ग्रहनही लागायचे....


मग का म्हणून त्याला दुखः हे लादायचे....


का म्हणून त्याचे मुक्तसंचाराचे अधिकार हेरायचे....


शुक्ल-कृष्णपक्षाला लपंडाव खेळनार हा चंद्र हसतमुखाने....


आपण मात्र सदैव आसमंतातच अस्तित्व ठवायचे, विहारायचे....


चंद्राशीवाय प्रकाशमान होवू शकत नाही चांदनी हे संपूर्ण जगाने मानले....


चंद्राच्या प्रकाशात तेज तिचे आज भुगोलानेही सिद्ध केले....


कधी नव्हे ते चांदनीने प्रथमच प्रेम केले....


प्रेमाचे प्रतिक म्हणून संपूर्ण ब्रम्हांड प्रेमींसाठी खुले केले....!!!!!!!



आजही प्रेमी येतात,आपापले चंद्र-चांदनी शोधतात....!

दुखः चंद्र-चांदनीचे जाणूनही ही गोड चुक करतात....!



......मौसम

Friday, March 9, 2007

"व्हँलेंटाइन".....!!!


.




प्रेम न करता,हे मन का शांत बसेल....!


काय सांगू भविष्यात माझंही कुणावर प्रेम असेल...!


कुणाची तरी वाट पाहण्यात माझही मन झुरेल....!


माझे मन तेव्हा कदाचीत मलाच हरेल....!


"फक्त माझा" म्हणून हक्कही माझाच असेल.....!


काय सांगू मी कदाचित तो दिवस फारसा दुर नसेल...!


माझ्या मनातील भाव ज्या व्यक्ति साठी ऊमलेल.....!


दिवस-रात्र ज्याचेच नाव माझ्या ओठी असेल.....!


क्षणभराचा दुरावा त्याव्यक्ती साठी तपासारखा वाटेल....!


माझ्या मनात अनावधानाने ज्याचेच प्रतिबिंब असेल...!


आज-ना उद्या भेटेल ज्या व्यक्तीला आपले मी मानेल...!


मनातील सारे भाव मी स्वताःहून सांगेल....!


एक ना एक दिवस मला असं कुणी गवसेल....!


माझे मन जेव्हा माझेच उरलेले नसेल......!


असही कधी घडेल मीही 'प्रेमात पडेल'.....!


तोच व्यक्ती माझा "व्हँलेंटाइन" असेल.....!



.......मौसम


.

यशवंत हो गुणवंत हो.....!!!!


.



यशवंत हो गुणवंत हो .


तुझी पाउले जातील तेथे दर्शन देइल अरुण....


माझ्या सदीच्छा सदैव तुला भरभरुन.....


अलगद तुला छेडनारा हा वरुण.....


सांजेचे सोनेरी किरण करताहेत अभिषेक आनंदून.....


जीवनातील प्रत्येक क्षण असू दे चिर-तरुण.....


बेभान समीर देवो तुला यश अजिंक्य होवून.......


आयुष्यातील प्रत्येक दिपक होवोत प्रज्वलीत तुझा हर्श जाणून....


तुझी प्रत्येक वाट असू दे पियुषाचे कुंभ भरुण.......


धरतीतलावरील प्रत्येक आभास तुझ्यासाठी असेल पहा नीट निरखून....


विसरु नकोस कधी एक मैत्रीण आहे "मौसमी" सदीच्छांचा पुष्पगुच्छ घेउन......!!!!



------- मौसम



.

आयुष्य न विझनारी होळी.....!!




.



दिवसमागून दिवस सरलेत पण तो दिवस काही आलाच नाही....!!!


जीवनाच्या वाटेवर नेमकी मी जिंकले की हरले हे देखिल कळलेच नाही....!!


ज्या स्वप्नांच्या विश्वात मी वावरतेय ते सत्य आहे कि मृगजळ याचा आजही मला अंदाज नाही....!!

दुःखाचे हे डोंगर श्रावणातल्या जलधरांप्रमाने एकदम बरसूनही जात नाही.....!!


थोडे-थोडे बरसुन कमीत-कमी अश्रुचेमार्ग मोकळही करत नाही.....!!!


आयुष्याच रंग नेमका कोणता हे ठरवणही इतक कठीण,हेही मला अजुनही कळ्ले नाही....!!


भावनांची होळी ही जागो-जागी पेटते..का मनुष्य-मनुष्यच्या भवनांना महत्व देत नाही??????


विश्वासाची राख जागोजागी मिळते..पण तयारचकशी होते हेही कळायला वाट नाही....!!


जेथे-तेथे जिवावर टांगती तलवार..खर्या प्रेमाची पायवाट सहसा दिसतही नाही....!!


खर प्रेम करुनही,सहन कराव लागत बरच काही तेही असे कि कुठल्याचप्रकारची अपेक्षा नाही...!!


मनात ठेवूनही चालायच नाही, कमीत-कमी स्वतःसोबत तरी प्रामाणिकपणा सोडायचा नाही....!!


हे जीवन खुप विचीत्र आहे,एक न सांगता येणारी वाट हे मात्र मी समजायची विसरली नाही...!!!


जीवन हे एक कोड आहे,न विझनारी होळी आहे..तुम्हालाही अनुभव आलाच असेल नाही????


काय मागावे आयुष्याला आज माझे मलाच कळत नाही.....!!!!


.....मौसम



.