Sunday, June 7, 2009

पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!


.


पावसाचे टपोरे थेंब आज परत एकदा भिजवून गेले.....!

तुझ्या-माझ्या ओल्या भेटीचे क्षण परत एकदा रोमांचित करुन गेले....!


अचानक बरसलेल्या त्या पावसाने मनातले भाव खोलवर नेले....!

तोच होता अविस्मरनिय दिवस जिथे तुझे-माझे अंतर संपले...!


त्याच पावसात काही गमावल्याचे व्रण खोलवर दडले होते......!

त्याच पावसात तुझ्या प्रेमाने मला नकळत कवेत ओढले होते....!


तुझ्या आलिंगणात प्रथमच प्रेमाच्या उबदारतेला मी अनुभवले....!

रडून-रडून केव्हा तुला येउन बिलगले हे मात्र आजही कोडेच राहीले....!


रोजच्याच त्या रस्त्याने पानझड आटोपल्या सारखे हिरवागार केले...!

अबोल आपल्या मनांना याच भेटीत निसर्गाने जवळ केले....!


आजचाही पाउस असाच काही होता पण समाधान डोळ्यात होते....!

कदाचीत हीच ना ती आत्मियता??? तुझे नी माझे मन कित्येक पावसाळे शोधत होते...!!!


--मौसम


.

Monday, April 13, 2009

एक रेघ म्हणून जन्माला येते एक स्त्री.....!


.


एक रेघ म्हणून जन्माला येते एक स्त्री...!


सोबत आई-वडील रुपी दोन रेघा फ़्री....!


दोन्ही हातात-हात बालपणरुपी त्रीकुटाची रीत ही....!


तारुण्यरुपी रेघेत चौरसाची नव्हे ना वाट ती ???


चौरसाच्या वाटेवर आहे भावी संसाराची दुचाकी.....!


पंचकोन,षटकोन,सप्तकोन नकळत करतात विवीध नात्यांची दाटी...!


यातनच होते..नव्या रेघेची उत्पत्ती...स्त्रीशक्ती हीच ती...!



...मौसम