नातं तुझं आणि माझं......
जीवनातच होते मिलन सुख-दुख्खाच,
सोप नसत वर्णने नात कळी-गुलाबाचं,
आकाशालाही सीमा दाखवेल नातं तुझं आणि माझं......
असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं....
पहिल्या पावसाशिवायच मातीला सुगंध देण्याचं,
दुर असुनसुद्धा मनाने जवळ येण्याचं,
अस्ताच्या सुर्यालासुद्धा सुर्योदय आठवण्याचं...
असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं...
मनाच्या सागरात लहरीत उठण स्पदंनांचं,
क्शितीज्याच्या आशा पल्लवीत करनार्या संदेशाचं,
कोकीळेने मधूर गाणे छेडने स्वर्ण-सुरांचं,
असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं....
रम्य-सुरम्य भेटीला उजाळा देण्याचं,
जसे या नात्या वीणा जगने व्यर्थाचं,
असे हे नाते नाजुक, कोमल, स्पर्शाचं.......
असचं आहे बघ नातं तुझं आणि माझं.........
.......मौसम