गुलाबाचे फुल......
बर्याच दिवसांनी आज एक जुनी वही गवसली,
उलट-सुलट करतांना मात्र हातातन निसटली,
तेच जुने फुल होते गुलाबाचे दांडी मात्र तुटली,
दबलेल्या त्या फुलाप्रमाने अश्रु मी दाबत उठली...
नाही-नाही म्हणता म्हणता अश्रुनीं मात्र वाट काढली..!
करपलेल्या पाकळ्या पाहून आठवणींची तार तुटली,
अजानतेपणाने आज तुझ्या नावाची हाकही उठली,
एके काळचे धारदार काटेही आज बोथट होवून तुटली,
नाही जानू शकले मना-मनांची गाठ एकाएकी कशी सुटली??
नाही-नाही म्हणता म्हणता अश्रुनीं मात्र वाट काढली...!
बर्याच जुन्या वहीत ही अशी गुलाबी वलय गवसली,
फुल जरी करपले तरी भावना मी मनात प्रसवली,
आपल्या गोड आठवणीची साद आजही आहे बसवली,
भविष्याच्य वाटेत परत भुतकाळाने मान वर काढली,
नाही-नाही म्हणता म्हणता अश्रुनीं मात्र वाट काढली....!
-मौसम.