.
दिवसमागून दिवस सरलेत पण तो दिवस काही आलाच नाही....!!!
जीवनाच्या वाटेवर नेमकी मी जिंकले की हरले हे देखिल कळलेच नाही....!!
ज्या स्वप्नांच्या विश्वात मी वावरतेय ते सत्य आहे कि मृगजळ याचा आजही मला अंदाज नाही....!!
दुःखाचे हे डोंगर श्रावणातल्या जलधरांप्रमाने एकदम बरसूनही जात नाही.....!!
थोडे-थोडे बरसुन कमीत-कमी अश्रुचेमार्ग मोकळही करत नाही.....!!!
आयुष्याच रंग नेमका कोणता हे ठरवणही इतक कठीण,हेही मला अजुनही कळ्ले नाही....!!
भावनांची होळी ही जागो-जागी पेटते..का मनुष्य-मनुष्यच्या भवनांना महत्व देत नाही??????
विश्वासाची राख जागोजागी मिळते..पण तयारचकशी होते हेही कळायला वाट नाही....!!
जेथे-तेथे जिवावर टांगती तलवार..खर्या प्रेमाची पायवाट सहसा दिसतही नाही....!!
खर प्रेम करुनही,सहन कराव लागत बरच काही तेही असे कि कुठल्याचप्रकारची अपेक्षा नाही...!!
मनात ठेवूनही चालायच नाही, कमीत-कमी स्वतःसोबत तरी प्रामाणिकपणा सोडायचा नाही....!!
हे जीवन खुप विचीत्र आहे,एक न सांगता येणारी वाट हे मात्र मी समजायची विसरली नाही...!!!
जीवन हे एक कोड आहे,न विझनारी होळी आहे..तुम्हालाही अनुभव आलाच असेल नाही????
काय मागावे आयुष्याला आज माझे मलाच कळत नाही.....!!!!
.....मौसम
.
1 comment:
gr8 one i really like this....
Post a Comment