Friday, March 9, 2007

यशवंत हो गुणवंत हो.....!!!!


.



यशवंत हो गुणवंत हो .


तुझी पाउले जातील तेथे दर्शन देइल अरुण....


माझ्या सदीच्छा सदैव तुला भरभरुन.....


अलगद तुला छेडनारा हा वरुण.....


सांजेचे सोनेरी किरण करताहेत अभिषेक आनंदून.....


जीवनातील प्रत्येक क्षण असू दे चिर-तरुण.....


बेभान समीर देवो तुला यश अजिंक्य होवून.......


आयुष्यातील प्रत्येक दिपक होवोत प्रज्वलीत तुझा हर्श जाणून....


तुझी प्रत्येक वाट असू दे पियुषाचे कुंभ भरुण.......


धरतीतलावरील प्रत्येक आभास तुझ्यासाठी असेल पहा नीट निरखून....


विसरु नकोस कधी एक मैत्रीण आहे "मौसमी" सदीच्छांचा पुष्पगुच्छ घेउन......!!!!



------- मौसम



.

आयुष्य न विझनारी होळी.....!!




.



दिवसमागून दिवस सरलेत पण तो दिवस काही आलाच नाही....!!!


जीवनाच्या वाटेवर नेमकी मी जिंकले की हरले हे देखिल कळलेच नाही....!!


ज्या स्वप्नांच्या विश्वात मी वावरतेय ते सत्य आहे कि मृगजळ याचा आजही मला अंदाज नाही....!!

दुःखाचे हे डोंगर श्रावणातल्या जलधरांप्रमाने एकदम बरसूनही जात नाही.....!!


थोडे-थोडे बरसुन कमीत-कमी अश्रुचेमार्ग मोकळही करत नाही.....!!!


आयुष्याच रंग नेमका कोणता हे ठरवणही इतक कठीण,हेही मला अजुनही कळ्ले नाही....!!


भावनांची होळी ही जागो-जागी पेटते..का मनुष्य-मनुष्यच्या भवनांना महत्व देत नाही??????


विश्वासाची राख जागोजागी मिळते..पण तयारचकशी होते हेही कळायला वाट नाही....!!


जेथे-तेथे जिवावर टांगती तलवार..खर्या प्रेमाची पायवाट सहसा दिसतही नाही....!!


खर प्रेम करुनही,सहन कराव लागत बरच काही तेही असे कि कुठल्याचप्रकारची अपेक्षा नाही...!!


मनात ठेवूनही चालायच नाही, कमीत-कमी स्वतःसोबत तरी प्रामाणिकपणा सोडायचा नाही....!!


हे जीवन खुप विचीत्र आहे,एक न सांगता येणारी वाट हे मात्र मी समजायची विसरली नाही...!!!


जीवन हे एक कोड आहे,न विझनारी होळी आहे..तुम्हालाही अनुभव आलाच असेल नाही????


काय मागावे आयुष्याला आज माझे मलाच कळत नाही.....!!!!


.....मौसम



.

Friday, December 29, 2006

स्वप्न....!!!!


स्वप्न होते की इच्छा हे अजुनही नाही कळाले.....!!!

का माझे मन वार्याच्या वेगाने पळाले.....
जे हवे होते ते नेहमीच दूर्-दूर् पळाले....
नको असतांनाही हे मन कुठेतरी जुळाले....

स्वप्न होते की इच्छा हे अजुनही नाही कळाले.....!!

माझेच विस्मरण झाले हे ही समजतांना विचारात बुडाले....
अनेक होत्या आकांशा पण भाव नाही जुळाले.....
स्वप्न होते ते हे मी परत एकदा भुलले....


स्वप्न होते की इच्छा हे अजुनही नाही कळाले.....!!

स्वपनाच्या या दुनीयेत मी नखशिखांत बुडाले...
केव्हाच सरली होती रात्र हे स्वप्न संपल्यावर कळाले....
स्वप्नांचे आणि माझे सूत कधीच नाही जुळाले....

स्वप्न होते की इच्छा हे अजुनही नाही कळाले.....!!

मी हरवले स्वताःला हे विचार करुन कळाले....
भ्रम होता तो माझा हे आर्वजून कळाले....
इच्छा होती कुठेतरी हे मलाही कळाले....

स्वप्न होते की इच्छा हे अजुनही नाही कळाले.....!!


असेच प्रतीबिंब मी स्वप्नातच अनूभवून पाहीले....
प्रत्यक्श नाही तर अप्रत्यक्शच मी मनातून खुलले....
इच्छा होती,नव्हता पोरखेळ,काळजालाही कदाचीत असेल कळाले....

स्वप्न होते की इच्छा हे अजुनही नाही कळाले.....!!!!!


-मौसम

Thursday, December 14, 2006

कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?


कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?

माझ्या मनातील सगळी दारं तुझ्याच अंगणात उघडायचीयं ....
तुझी वाट पाहत मला,माझे उर्वरीत स्वप्न साकारायचेय....
संगतीतले ते अनमोल दिवस मनोमनी स्मरायचेयं....

कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?

आठवतात ते दिवस म्हणायचास "मला तुला भेटायचयं"....
शब्दानी नाही शक्य तरी डोळ्यानीच बोलायचयं....
माझ्या मनातीलमोरपीस आता असाच काही फिरवायचयं....

कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?

आठवतात ते दिवस म्हणायचास,"मला तुझ्या सोबत हसायचयं"....
क्शनभर का होइना मला तुला हसवायचयं....
तुझ्या मनात अशीच एक स्वरांची तान मला छेडायचीयं....

कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?


तुझे स्वप्न माझ्या आणि माझे स्वप्न तुझ्या डोळ्यात मला बघायचयं....
आठवणीत तुझ्या जगतांना मला ओंजळ झाकून रडायचयं....
आज जरी शक्य नाही तरी उदया काही सांगायचयं....


कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?


तुझा तो शांतपणा मला नेहमीसाठी जपायचायं....
जोडाक्शरांच नातं मला तुझ्या सोबत जोडायचयं....
या जन्मात शक्य नसले तर दुसरा जन्म मागायचयं....


कस सांगू तुला मलाही काही बोलायचय...?
- मौसम

Saturday, December 9, 2006

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!


ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,

बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!

हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,

मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!


वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,

ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!

वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,

कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!


वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,

क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!

वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,

लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!!!


...मौसम

Wednesday, December 6, 2006

मी आणि तू.......


एका 'आणि' चे अंतर तुझ्यात आणि माझ्यात..

सगळ्याना हेवा वाटावा इतका जिव्हाळा,एकरुपी दोन जीवात...

कोसोदूर असून क्शनभराची पाउलवाट ,तुझ्यात आणि माझ्यात..



हेच तर विषेश आहे, तुझ्यात आणि माझ्यात..



एकच मनाचा आवाज तुझ्या-मझ्या श्वासात...

'हम-तुम' ची प्रतीक्रूती,दोन जीवाच्या काळजात..

जन्मोजन्मीचा भावनीक ओलावा,तुझ्यात आणि माझ्यात.. !!!



हेच तर विषेश आहे, तुझ्यात आणि माझ्यात..



तुझा विश्वास माझ्यात,माझा विश्वास तुझ्यात..

एकच स्वप्न डोळ्यात ,तुझ्यात आणि माझ्यात..

चंद्र-धरतीच्या नात्याप्रमाने अतुट नजरानजर,आपल्या या नयनात..



हेच तर विषेश आहे, तुझ्यात आणि माझ्यात..



नकळत होनारे रुसवे-फुगवे,कधीतरी संभाषनात...

कळीला हळूच छेडनारा कोवळा स्पर्श,आपल्या सहवासात..

तू ‘तू’ आहे आणि मी ‘मी’ हे जाणून सुद्धा एकरुपतेचा आधार,
तुझ्यात आणि माझ्यात..

हेच तर विषेश आहे, तुझ्यात आणि माझ्यात......!!!!


....मौसम

Saturday, December 2, 2006

आता मला हसतच जगायचयं....!!!!!


आता मला हसतच जगायचयं....!!!!!

येणारा काळ मला पूर्णपणे खुलवायचायं...,
जीवणातला प्रत्येक रस मला अनुभवायचयं....,
मनाला हवा-हवासा हट्ट मला पुरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

कल्पनेतल्या वळनाला अस्तीत्वात आणायचयं....,
'अशक्य ' या शब्दाला 'शक्यने ' बदलायचयं....,
आयुष्यातील लोखंडाहून पारसच फिरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

येणारया काळात नवीन उमेदीने जगायचयं....,
अश्रुनी नाही तर आनंदाश्रुनी भिजायचयं....,
हरवलेल्या 'मी' ला परत आणायचयं....,


आता मला हसतच जगायचयं.....!!!!!


-मौसम